...अशी पेटली‌ पुण्यात भर‌ रस्त्यात कार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे : धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर चौकात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोटारीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जळून खाक झाला. मोटारीच्या मागील बाजूस असलेल्या सीएनजी टाकीचा स्फोट न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटारीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. 
 

पुणे : धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर चौकात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोटारीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जळून खाक झाला. मोटारीच्या मागील बाजूस असलेल्या सीएनजी टाकीचा स्फोट न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटारीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली

स्वारगेटपासून काही अंतरावर धावत्या मोटारीच्या (क्रमांक- एमएच 01 पीए 5146) इंजिनमधून अचानक धूर निघण्यास सुरवात झाली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत मोटार थांबवली आणि तो बाहेर पडला. मोटारीच्या पुढच्या टायरने पेट घेतला. त्यानंतर पाच मिनिटांतच मोटारीने पेट घेतल्यानंतर दोन छोटे स्फोटही झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत या रस्त्यावरून वाहतूक सुरूच होती. काही नागरिकांनी बाजूच्या इमारतीमधील पाईपमधून पाण्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले.

अग्निशमन अधिकारी समीर शेख, तांडेल राजाराम केदारी, जवान योगेश चोरगे, मंगेश मिळवणे, राजेश घडशी, प्रकाश कांबळे यांनी घटनास्थळी पोचले. त्यांनी तीन-चार मिनिटांतच आग आटोक्‍यात आणली. स्वारगेटजवळ पुलावर वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक दलाच्या गाडीला घटनास्थळी पोचण्यास उशिर झाल्याचे सांगण्यात आले. 

 

Web Title: burning car in pune