हिंजवडीत जाळला जातोय कचरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - राजीव गांधी आयटी पार्क म्हणून देशात ख्याती मिळविलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित कंपन्या आणि लगतचे रहिवासी उघड्यावरच कचरा जाळतात. त्यामुळे प्रदूषण होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या घनकचऱ्याचे संकलन व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे अज्ञातांकडूनच कचरा जाळला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

हिंजवडी आयटी पार्कच्या फेज एक, दोन आणि तीनमधील कंपन्यांकडून त्यांच्या आवारातील कचरा आवारातच जिरविला जातो. मात्र, हिंजवडी, माण व म्हाळुंगे गावालगत नागरीकरण वाढल्यामुळे तेथे ऐन उन्हाळ्यात कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, आयटी पार्कच्या मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, सकाळ व दुपारी अचानक कचरा पेटविण्याच्या घटना घडत आहेत. 

या संदर्भात स्थानिक रहिवासी सचिन पाटील म्हणाले, ‘‘आयटी पार्कलगत नागरी वस्त्या वाढल्या आहेत. परंतु, त्यातुलनेत कचरा संकलन आणि विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात अज्ञात व्यक्तींकडून कचरा जाळला जातो. त्यामुळे आसपासच्या परिसरात धुरामुळे प्रदूषण होत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत.’’

स्मिता नाईक म्हणाल्या, ‘‘इमारतींमधील कचरा व्यवस्थित संकलित होतो, परंतु तो मोकळ्या जागांवर उघड्यावरच जमा केला जातो. काही दिवसांनी त्याला आग लावली जाते.’’ 

Web Title: Burning the garbage at Hinjewadi