देखभाल नसल्यामुळेच बसचा अपघात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - पीएमपी बस देखभालीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारज्यात मंगळवारी झालेला अपघात बसच्या पुरेशा देखभालीअभावी झाल्याचे पीएमपीच्या प्राथमिक तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित बस भाडेतत्त्वावर पुरविणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्स्पोर्टवर कारवाई करण्याचे सूतोवाच पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी बुधवारी केले. तसेच, सर्व बसच्या देखभाल दुरुस्तीवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यास त्यांनी सांगितले आहे. 

कात्रज-निगडी बसचा काल झालेला अपघात स्टीअरिंगचा रॉड तुटल्याने प्राथमिक तपासणीत उघडकीस आला आहे. या बसची पुरेशी देखभाल झाली होती का, याबाबत आता तपास सुरू आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास महालक्ष्मी ट्रान्स्पोर्टवर दंडात्मक कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गुंडे यांनी अपघातस्थळाला बुधवारी भेट दिली. त्यात रस्त्याच्या बाजूला सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग नव्हते, असे दिसून आले आहे. ते असते, तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती, असे दिसून आले. 

खासगी बसची तपासणी करण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत तपासणी करून देखभाल दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी खासगी बस पुरविणाऱ्या पाच ठेकेदारांच्या प्रतिनिधींचीही बैठक पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी घेतली. 

पासिंग करताना त्रुटी 
पीएमपीच्या बसचे पासिंग करताना, त्यात अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीओच्या दोन निरीक्षकांनी 28 मे रोजी बसचे पासिंग करण्यास नकार दिला. परंतु, आरटीओ आणि पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याने त्या बसचे पासिंग करावे, असा आरोप परिवहन विषयाचे अभ्यासक श्रीकांत कर्वे यांनी केला आहे. 

Web Title: Bus accident due to lack of care

टॅग्स