नाशिक-पुणे मार्गावर कुकडी नदीच्या पुलावर प्रवासी बसला अपघात

दत्ता म्हसकर
सोमवार, 9 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडी,ता.जुन्नर येथील कुकडी नदीच्या पुलावर सोमवारी (ता.10) पहाटे दोनच्या सुमारास महालक्ष्मी प्रवासी बस क्रमांक MH 04 FK 1360चा अपघात झाला.

बसमध्ये 26 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पुण्याहून येणारी महालक्ष्मी प्रवासी बस पिंपळवंडी येथील कुकडी नदीच्या पुलावर आली असता गाडीचा पुढचा टायर फुटला व गाडी कठड्याला जाऊन धडकली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.

ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या जवळच व्यावसायिक गाळे आहेत. तेथील इस्त्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, पहाटे दोनच्या सुमारास बाहेर मोठा आवाज झाला तो ऐकुन आम्ही बाहेर आलो तर बस दुभाजकालाला धडकलेली होती. चालकाच्या प्रसंगवधानाने प्रवाशांचे प्राण वाचले.

चाळकवाडी (ता.जुन्नर) येथील टोल नाका सुरु होऊन वर्ष झाले आहे. अद्यापही नारायणगाव, पिंपळवंडी, आळेफाटा या ठिकाणचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. नारायणगाव या ठिकाणी ट्रॅफिकचा सामना प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: bus accident on nashik pune highway on kukadi river bridge