इंधन दरवाढीने खाजगी बस व्यावसायांवर परिणाम 

अशोक गव्हाणे
गुरुवार, 24 मे 2018

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत पेट्रोलचा दर 84 तर डिझेलही 73 वर पोचले आहे. त्यामुळे बस व्यावसायिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील बस व्यवसाय अडचणीत आला आहे. दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दरांच्या तुलनेत तिकीट दर वाढत नाही, त्यामुळे  हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सहा महिन्यांपूर्वीचे तिकीट दर आजही कायम आहेत. परंतु डिझेलच्या दरात मात्र सहा महिन्यात 10 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्रवाशी तिकीटाचे दर वाढत नसले तरी इंधन दरवाढ सतत चालू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत पेट्रोलचा दर 84 तर डिझेलही 73 वर पोचले आहे. त्यामुळे बस व्यावसायिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात साधारणता अंदाजे 500 व्यावसायिक आहेत. या बस व्यावसायिकांच्या माध्यमातून राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक होते. जवळपास सर्व मिळून अंदाजे 1000 बसच्या माध्यमातून ही प्रवाशी वाहतूक होत असते. तर परराज्यातूनही येणाऱ्या बसची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दिवसभरात शहरासह जिल्ह्यात बस व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. त्यावर अंदाजे 500 बस व्यावसायिक त्यांच्याकडील कर्मचारी, ड्रायव्हर असा अंदाजे 10 ते 15 हजारांवर व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. 

दरवाढीच्या नावावर इंधन दरवाढीचा थेट बसच्या तिकीट दरावर परिणाम झालेला नसला तरी बस व्यावसायिकांचा खर्च वाढला आहे, हे निश्‍चित. 

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई या भागात मोठ्या प्रमाणात शहरातून मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक होते तसेच, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आणि मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात शहरातून प्रवाशी वाहतूक होत असते. 

दररोजच्या डिझेल दरवाढीमुळे व्यावसाय पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. ज्यापद्धतीने डिझेलचे दर दररोज वाढत आहेत, त्या पद्धतीने तिकीटाचे दर वाढवू  शकत नाही. तिकीट दर वाढवल्यावर धंदा कमी होणार परिणामी बराच खर्च खिशातून करावा लागत आहे. हंगामी तिकीट दर वाढवल्यावर सरकारचाही आक्षेप असतो. परंतु, हंगामी तिकीट दर का वाढवावे लागत आहेत यावर सरकारने विचार करायला हवा. 
 - बाजीराव कोंढाळकर खाजगी बस व्यावसायिक, पुणे

Web Title: bus business are in problem due to fuel price are regularly increase