पुण्यात पुन्हा शॅार्ट सर्किटमुळे बसला आग (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

हडपसर : रामटेकडी येथे बीआरटी मार्गात पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. हडपसर अग्नीशामक केंद्राच्या जवानांनी तातडीने ही आग शमविली. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली. 
बस पूर्ण प्रवाशांनी भरली होती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बस हडपसरहून कात्रजच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालक विलास जाधव यांना बसच्या इंजीनजवळ शॅार्ट सर्कीट झाल्याची जाणीव झाली. त्यांनी खाली उतरून इंजिनची पाहणी करत असताना त्यांना आग दिसली. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. बस पूर्ण प्रवाशांनी भरली होती. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान हडपसर आग्नीशाक केंद्र प्रमुख शिवाजी चव्हाण, मारूती शेलार, दत्ता चौधरी, सखाराम पवार यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

Web Title: bus caught Fire again due to a Short circuit in Pune