घरी जायची वेळ अन् बसने अडवली चार तास वाट

कोथरूड - बंद पडलेल्या पीएमपी बसमुळे अडकून पडलेली कार.
कोथरूड - बंद पडलेल्या पीएमपी बसमुळे अडकून पडलेली कार.

पुणे - पीएमपीची बंद पडलेली बस बाजूला न घेतल्याचा फटका शनिवारी कोथरूड येथे दोघांना बसला. कार्यालयातील काम संपवून घरी जायचे असताना केवळ कारच्या पाठीमागे थांबलेली पीएमपी बस बाजूला होत नव्हती. त्यामुळे त्यांना चार तासांपेक्षा जास्त वेळ यंत्रणेशी संघर्ष करावा लागला. पोलिस, पीएमपी, ठेकेदार यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही. अखेर कार रस्त्यावर सोडून रिक्षाने घरी जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

सचिन शहा हे हांडेवाडी येथे, तर अमोल कदम हे दिघीला राहतात. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर त्यांचे कार्यालय आहे. सकाळी रस्त्याकडेला कार पार्क करून ते कार्यालयात गेले. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास काम संपवून घरी निघाले. पण, कारच्या पाठीमागे पीएमपी बस लावली होती. 

शेजारच्या दुकानात चौकशी केली. तेव्हा ती बंद पडल्याचे कळाले. त्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही बस बाजूला काढण्याची असमर्थता दर्शवली. त्यामुळे त्यांनी कोथरूड डेपोत संपर्क साधला. तेथे ही बस ठेकेदाराची आहे, असे सांगितले. डेपोतून बस हलविण्यासाठी टोइंग गाडी पाठवली. पण, बसचे एअरब्रेक लावल्याने ती बाजूला काढता आली नाही. 
शहा यांनी ठेकेदार विशाल सुतार यांच्याकडे फोन करून तक्रार केली. त्यांनी बस हलविण्यासाठी टोइंग गाडी पाठवतो, असे सांगितले. 

रात्री साडेनऊ वाजून गेले, परंतु कोणीच फिरकले नाही. शेवटी शहा आणि कदम हे त्यांच्या कार तेथेच सोडून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com