सक्षम यंत्रणेसाठी बससंख्या वाढवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पिंपरी - ‘पीएमपीएमएल’ बसची संख्या आणि फेऱ्यांची वारंवारता वाढवा. प्रवाशांना सौजन्यशील वागणूक द्या. चांगले बसथांबे, वाजवी तिकीटदर, ऑनलाइन व मोबाईल तिकीट यंत्रणा, पुरेशी स्वच्छता आदी सुविधा द्या, अशा विविध मागण्या गुरुवारी नागरिकांनी केल्या. निमित्त होते चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये ‘पीएमपीएमएल’तर्फे आयोजित कार्यशाळेचे.   

पिंपरी - ‘पीएमपीएमएल’ बसची संख्या आणि फेऱ्यांची वारंवारता वाढवा. प्रवाशांना सौजन्यशील वागणूक द्या. चांगले बसथांबे, वाजवी तिकीटदर, ऑनलाइन व मोबाईल तिकीट यंत्रणा, पुरेशी स्वच्छता आदी सुविधा द्या, अशा विविध मागण्या गुरुवारी नागरिकांनी केल्या. निमित्त होते चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये ‘पीएमपीएमएल’तर्फे आयोजित कार्यशाळेचे.   

‘पीएमपीएमएल’तर्फे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व्यापक व्यवसाय आराखडा (बिझनेस प्लॅन) तयार करण्याचे काम 
हाती घेतले आहे. त्या अंतर्गत झालेल्या या कार्यशाळेत नागरिकांशी खुल्या संवादाचा कार्यक्रम झाला. ‘पीएमपीएमएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे, विभागीय अधिकारी संतोष माने, इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसीच्या (आयटीडीपी) प्रांजली देशपांडे आदी उपस्थित होते.
 

नागरिकांच्या मागण्या  

श्‍याम पांढरे (चिंचवड) : सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात. पुढील व मागील दरवाजावर बस मार्गाची माहिती देणारे फलक लावावे.

मोहन गोखले (ज्येष्ठ नागरिक, चिंचवड) : ‘पीएमपीएमएल’ साठी निधी संकलनासाठी कॅश सर्टिफिकेट योजना चालू करावी. 
त्यामध्ये नागरिक गुंतवणूक करतील. विविध योजनांसाठी ज्येष्ठ नागरिक काम करण्यास तयार आहेत. 

अमोल देशपांडे (सिटिझन फोरम) : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय असावे. हिंजवडी परिसरात वर्तुळाकार बससेवा सुरू करावी. 

ठकाजी नाईकडे : प्रवाशांना सौजन्यशील वागणूक देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.

राजेंद्र अंकईकर (प्राधिकरण) : मोफत बससेवेऐवजी किफायतशीर दरात सेवा द्यावी. ‘पीएमपीएमएल’ची सेवा सक्षम, समाजोपयोगी कशी होईल, यावर भर द्यावा.

प्रशासनाची भूमिका :
सुषमा कोल्हे (मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएमएल) : सक्षम बस सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऑनलाइन, मोबाईल तिकीट या संकल्पनांवर काम सुरू आहे. सोशल मीडियातूनही तक्रारींचे निवारण केले जाते.

अनंत वाघमारे (महाव्यवस्थापक, पीएमपीएमएल) : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पीएमपीएमएलला तीन हजार बसची गरज आहे. परंतु सद्य:स्थितीत १५०० नव्या बस घेत आहोत.

Web Title: bus increase for enabled system