आरटीओच्या नियमांमुळे बस लांबणीवर

Bus-Pune
Bus-Pune

पिंपरी - आरटीओने नियमात बदल केल्याने पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या बस लांबणीवर पडल्या आहेत. याबाबतची माहिती संबंधित कंपन्यांनी वेळेवर का दिली नाही, अशी विचारणा पीएमपीच्या बैठकीत करण्यात आली. आगामी बैठकीत खुलासा करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली.

बैठकीला पिंपरी- चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पुणे स्थायी समिती सभापती सुनील कांबळे, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. याबाबत महापौर जाधव म्हणाले, ‘‘जून व जुलैमध्ये पीएमपीच्या ताब्यात १२५ नवीन बस येणे अपेक्षित होते. मात्र, आरटीओने नियमात बदल केले आहेत. यामुळे नवीन बस येण्यास उशीर लागणार आहे. मात्र, नियमात बदल झाल्याची माहिती संबंधित बसपुरवठा करणाऱ्या कंपनीने पीएमपीच्या अधिकाऱ्यांना वेळेवर का दिली नाही, याचा खुलासा आगामी बैठकीत ११ जुलै रोजी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, वेळेवर बस उपलब्ध करून न दिल्याबाबत संबंधित पुरवठादाराला प्रतिदिन, प्रतिबस दहा हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे.’’

सध्या पीएमपीच्या बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत कार्यशाळेत विशेष लक्ष देऊन हे प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्याची माहिती जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com