बस खरेदीसाठी १६६ कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - सीएनजीवर चालणाऱ्या चारशे बस पीएमपी विकत घेणार आहे, त्यासाठी महापालिकेच्या हिश्‍श्‍याप्रमाणे २४० बस घेण्यासाठी पीएमपीएलला १६६ कोटी रुपयांचा निधी देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. 

पीएमपीएलच्या ताफ्यात सध्या १७०० बस आहेत, त्यापैकी १४०० बस प्रत्यक्षात मार्गावर आहेत. बससेवा सुधारण्यासाठी ३ हजार २०० बसची पीएमपीएलला आवश्‍यकता आहे. ऑगस्ट २०१९ पर्यंत नव्याने एक हजार बस ताफ्यात दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, त्यानुसार सीएनजीवर चालणाऱ्या नॉनएसी ४०० बसबरोबर १५० नवीन इलेक्‍ट्रिक बसही पीएमपीएलच्या ताफ्यात येणार आहेत. 

मे. टाटा मोटर्सने ४८ लाख ४० हजार ४५५ रुपयांत बस देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार २४० बस खरेदीसाठी पीएमपीला आपल्या हिश्‍श्‍याचे १६६ कोटी १७ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

Web Title: Bus Purchasing 116 Crore Rupees Proposal