esakal | पुण्यात आजपासून धावणार 'PMP' पण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १६ बस पीएमपीकडून भाडेतत्‍तवावर घेतल्या आहेत.

पुण्यात आजपासून धावणार 'PMP' पण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस वाहतुक सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने दोन्ही शहरातील २० मार्ग निश्चित केले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू झाली आहे तर, पुण्यातील वाहतूक बुधवारपासून सुरू होणार आहे.  

या मार्गावर धावणार बस
नांदेडसिटी ते डेक्कन, आयएटी खडकवासला ते पुणे स्टेशन, औंध ते डेक्कन, विमाननगर ते महापालिका भवन, विश्रांतवाडी ते महापालिका भवन, सांगवी ते पुणे स्टेशन, चिंचवडगाव ते पुणे स्टेशन, मनपा - वाघोली, मनपा ते लोहगाव, मनपा ते कोंढवा हॉस्पिटल, मनपा ते वडगाव शेरी, वारजे माळवाडी ते पुणे स्टेशन, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, वारजे माळवाडी ते मनपा, कात्रज- आरटीओ-कात्रज, कात्रज- पुणे स्टेशन, भेकराईनगर ते मनपा, सासवड ते पुणे स्टेशन, तळेगाव ते मनपा, राजगुरूनगर ते मनपा या मार्गांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू होणार आहे.

कोणत्या वेळेत मिळणार बस सेवा
सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी एक ते रात्री नऊ दरम्यान ही बससेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. 

कोणाला करता येणार बस प्रवास?
या बसमध्ये दोन्ही महापालिकांचे कर्मचारी, ससून व खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच शासकीय कर्मचाऱयांनी ओळखपत्र दाखविल्यावर त्यांना प्रवेश मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ४१ बसचे नियोजन करण्यात आले आहे. दर एक तासांनी त्या बस मार्गांवर धावतील. 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

लसीकरणासाठी बसचा वापर 
पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १६ बस पीएमपीकडून भाडेतत्‍तवावर घेतल्या आहेत. या बसचा वापर त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारित राहणाऱया नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येत आहेत. 

loading image