आली रे.. आली.. कामगारांसाठी... बस आली....

आली रे.. आली.. कामगारांसाठी... बस आली....

तळेगाव ढमढेरे : आली रे.. आली.. कामगारांसाठी... बस आली.... कामगारांचा एकच आवाज घुमुन पीएमपीएमएलच्या नवीन बसचे एमआयडीसीतील कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत केले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते बसचे पूजन करून चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.

वाघोली ते रांजणगाव गणपती या मार्गावर १६१ क्रमांकाची बस सेवा कालपासून दर अर्ध्या तासाला सुरु झाली. आज मात्र ही बस रांजणगाव एमआयडीसीतील शेवटच्या टोकातील जोटून कंपनीच्या गेटपर्यंत गेल्याने कामगारांनी विशेष कौतुक करून, समाधान व्यक्त केले. 

"ही बस पुणे स्टेशन पर्यंत जाणार असून एक प्रवाशास ६० रुपये तिकीट दर असल्याचे महिला वाहकांनी सांगितले. ही बस रात्री मुक्कामाला असून प्रवाशांनी सहकार्य करण्याची अपेक्षा महिला बस वाहकानी व्यक्त केली आहे." यावेळी उद्योजक संपत शेळके, गणेश लांडे, सचिन दूंडे, योगेश कर्डिले, विठ्ठल नळकांडे, विजय खेडकर, अमोल डोळस, नितीन खेडकर, दादा संगपाळ, गणेश बांदल, राहुल सगपाळ, विलास बत्ते, सोमनाथ लांडे, दिलीप बत्ते, संतोष गोरड आदी उपस्थित होते. 

"अनेक वर्षापासून पुणे ते रांजणगाव गणपती पर्यंत बस सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांची होती. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून बससेवा सुरु झाली असून, या बससेवेचा कामगार, महिला व इतर प्रवाशांना लाभ होणार असल्याचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.

रांजणगाव हे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असल्याने तसेच येथे पंचतारांकीत एमआयडीसी असल्याने स्थानिकांसह कामगार प्रवाशांची संख्या मोठी आहे, बसमुळे आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. पुण्यापासून रांजणगाव ५२ किलोमीटर असून येथे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र आहे. रांजणगाव हे पर्यटन स्थळ असल्याने बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com