वानवडीत पुन्हा सुरु होणार बसपास केंद्र

संदीप जगदाळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

हडपसर - वानवडी येथील प्रभाग क्रय २५ मधील चौदा वर्षापूर्वी सुरू असलेले पीएमपीएल पास केंद्र तुकाराम मुंडे यांनी अचनाक बंद केले होते. नगरसवेक व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पीएमपीएमल अध्यक्ष नयना गुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून हे पास केंद्र पुन्हा सुरू केले. या केंद्रात विदयार्थी, नागरिकांसाठी मासिक व वार्षीक आणि दैनंदिन पास दिले जाणार आहेत.

जगताप म्हणाले 2004 पासून वानवडी येथे पास केंद्र सुरू केले होते. मात्र अचनाक कोणतेही कारण नसताना माजी पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी ते बंद केले होते. त्यामुळे महमदवाडी, कोंढवा आणि वानवडी भागातील नागरिकांना पुलगेट अथवा हडपसर येथे पास काढण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून हे केंद्र पुन्हा सुरू केले आहे.

नागरिक सविता जाधव म्हणाल्या, वानवडीत पून्हा पास केंद्र सुरू झाल्याने अनेक नागरिकांची सोय होणार आहे. प्रशांत जगताप यांनी पाठपुरावा केल्याने हे केंद्र सुरू झाले. आमच्या भागात पीएमपी बसने प्रवसा करणा-या विदयार्थी व नागरिकांची संख्या खूप आहे. त्यामुळे या केंद्रामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Web Title: Bus station will resume in Wanwadi