उद्योगासाठीच्या साखरेचे भाव वाढविण्याचा विचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

पुणे - सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन वाढणार आहे. साखरेचे भाव टिकावे आणि उसाला एफआरपीनुसार भाव मिळावा, उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे भाव वाढविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. घरगुती वापराच्या साखरेच्या भावातील तफावतीच्‍या रकमेचा उपयोग उसाला भाव मिळवून देण्यासाठी करता येऊ शकतो, असे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

साखरेचे उत्पादन वाढल्याने भाव कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उसाला एफआरपीनुसार भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. पुढील वर्षीच्या हंगामातही साखरेचे उत्पादन वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काही उपाय करणे आणि निर्णय घेणे आवश्‍यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेट मागितली आहे. पुढील वर्षात साखरेचा बफर स्टॉक करून ती स्वस्त धान्य दुकानात विक्री करावी. हंगामाच्या सुरवातीच्या कालावधीतील उत्पादित कच्ची साखर निर्यात करण्यासाठी अनुदान देणे, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन साखरेचे बाजारातील भाव स्थिर ठेवता येईल का, अशा विविध मुद्यांवर पंतप्रधानांबरोबर चर्चा करून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: business sugar rate increase