कोट्यवधी रुपयांच्या कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या पुणे विभागाची कारवाई
Businessman arrested for tax evasion Action of Pune Division Maharashtra Goods and Services Tax Department
Businessman arrested for tax evasion Action of Pune Division Maharashtra Goods and Services Tax Departmentesakal

पुणे : तब्बल ४१ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलाच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट सादर करून ७ कोटी ३८ लाख रुपयांचा कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने हि कारवाई करण्यात आली.व्यापाऱ्याला १४ दिवसांची न्यायालतीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मे.जिरवाला मेटल्स या कंपनीचा प्रवीण भबुतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने करचुकवेगिरी विशेष अन्वेषण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत बोगस बिलप्रकरणी हि कारवाई करण्यात आली.

राज्य कर पथकाने सर्वसमावेशक तांत्रिक विश्लेषण करून व इतर विभागांशी समन्वय साधून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध सुरू केला आहे तसेच या मोहिमेद्वारे विभागाकडून आतापर्यंत दहा कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईद्वारे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना विभागाने इशारा दिलेला आहे. तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडे बोगस व्यापाऱ्यांची माहिती असून त्यांच्यावर लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे विभागाचे राज्यकर अतिरिक्त आयुक्त धनंजय जाखडे, सहआयुक्त रेश्मा घाणेकर, अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे, उपायुक्त (अन्वेषण) दत्तात्रय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्वेषण) सतीश दगडु पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सहाय्यक आयुक्त सचिन सांगळे दत्तात्रय तेलंग प्रणाली औटी यांच्यासह राज्य कर निरीक्षक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com