गुंतवणुकीचे आमिष दाखवून 16 कोटींची फसवणूक 

गुंतवणुकीचे आमिष दाखवून 16 कोटींची फसवणूक 

पिंपरी (पुणे) : 'गुंतवणुकीवर अधिकचा परतावा देतो', असे सांगून एका दाम्पत्याने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड यांची 16 कोटी 45 लाखांची फसवणूक केली. 

याप्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (वय 46, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद रामचंद्र जाधव व सुवर्णा विनोद जाधव (दोघेही रा. विमाननगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हणमंत गायकवाड व त्यांच्या पत्नीने आरोपीच्या सावा मेडिको या कंपनीत सुमारे 12 कोटी 46 लाखांची गुंतवणूक केली. त्याबदल्यात आरोपीने त्यांना केवळ एक कोटी 53 लाख 95 हजार रुपयांचाच समभाग दिला.

तसेच, गायकवाड यांना जाधवने त्यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, अनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, बायोडिल लेबोरिट लिमिटेड या कंपनीत एकूण 16 कोटी 45 लाख रुपये गुंतविण्यास सांगितले. त्याबदल्यात आकर्षक परतावा देण्याचेही सांगितले. मात्र, गायकवाड यांनी दिलेल्या रकमेचा कसलाही समभाग, परतावा अथवा मुद्दल त्यांना न देता त्यांची फसवणूक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com