नवी सांगवीमध्ये व्यावसायिकाचा खून 

संदीप घिसे 
सोमवार, 19 मार्च 2018

नवी सांगवी येथील कैलास रामजी तौर या व्यावसायिकाचा खून झाला आहे.

पिंपरी - नवी सांगवी येथील एका व्यावसायिकाचा खून झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. 19) दुपारी उघडकीस आली. कैलास रामजी तौर (वय 35 रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास यांचे पिंपळे निलख येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर न आल्याने तसेच फोन न उचलल्याने त्यांचा नोकर त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या घरी आला. त्यावेळी कैलास यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली होती. त्यांच्या नोकराने कडी उघडून आत प्रवेश केला असता कैलास हे बाथरूममध्ये जखमी अवस्थेत दिसून आले.

कैलास यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर जखमा दिसून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धार्मिक कार्यक्रमासाठी कैलास हे आपली पत्नी व मुलांसह गावी गेले होते. पत्नी व मुलांना गावी ठेवून कालच ते पुण्यामध्ये आले होते. खुनाच्या या घटनेमुळे नवी सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

Web Title: a businessman murder in navi sangavi