कर भरण्याच्या व्यावसायिकांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पिंपरी - कराचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सुमारे ७०० व्यावसायिकांना वस्तू आणि सेवाकर विभागाकडून नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात २० व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वस्तू आणि सेवाकर विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

केंद्र सरकारने गेल्या वर्षी एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीला सुरवात केली. आतापर्यंत अनेकांनी रिटर्न फाइल केले नाहीत. वस्तू आणि सेवाकर विभागाने अशा व्यावसायिकांची माहिती जमा करून त्यांना नोटिसा पाठवून कराचा भरणा न करण्याबाबतचे कारण विचारले आहे. वस्तू आणि सेवाकराची नोंदणी न करणाऱ्यांनाही पत्र पाठविले आहे. 

कराचा भरणा न करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी सर्वे करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीत भागीदारीत व्यवसाय करणारे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांनी कर चुकविल्याचे निदर्शनास आले आहे.

व्यावसायिकांना एक जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंतचा वार्षिक ताळेबंद सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यावसायिकांकडून प्राप्तिकराचे रिटर्न भरले जातात, त्या माहितीच्या आधारे विभागाला संबंधित व्यावसायिकाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळू शकणार आहे.

काय कारवाई होणार 
  वस्तू आणि सेवाकर विभागाकडे ३० सप्टेंबरपर्यंत वार्षिक ताळेबंद सादर न करणाऱ्या व्यावसायिकांना परताव्याची रक्‍कम मिळणे कठीण होऊ शकते. 
  नोंदणी रद्द होऊ शकते. 
  इनपुट टॅक्‍स क्रेडिट क्‍लेमची सुविधा ब्लॉक होऊ शकते.

Web Title: Businessman Notice for GST tax