जीएसटीच्या अटींमुळे व्यापारी संकटात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे - ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) मधील किचकट अटीमुळे छोटे व्यापारी संकटात सापडले आहेत. त्यांना यातून दिलासा मिळावा, अशी मागणी वेळोवेळी केली असून, त्याला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, असे कर सल्लागार धनंजय येवले यांनी स्पष्ट केले. 

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्‍वभूमीवर येवले यांनी ‘सकाळ’कडे छोट्या व्यापाऱ्यांच्या जीएसटीसंदर्भातील अडचणी मांडल्या. जीएसटीमधील तरतुदीनुसार व्यवहाराचा तपशील महिन्याच्या वीस तारखेपर्यंत सादर करावा लागतो. मात्र या मुदतीत व्यवहार पूर्ण होत नाहीत. तपशील मुदतीत सादर न केल्याने प्रतिदिन ५० रुपये दंड भरण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येते. वीस लाख रुपयांची उलाढाल असलेले व्यापारी जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत. परंतु त्यांना मोठ्या व्यापारी कंपन्यांबरोबर व्यवहार करताना जीएसटी भरावा लागतो, अशा विविध अडचणी येवले यांनी मांडल्या. छोट्या व्यापाऱ्यांना तीन महिन्यांनी व्यवहाराचा तपशील सादर करण्याची मुभा मिळावी यासह अन्य मागण्यांकडे राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात पुन्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: businessman problem by GST rules