बाह्यवळण बनले अपघाती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पुणे - दुतर्फा झालेल्या गृहप्रकल्पांमुळे जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडणारे पादचारी, बेशिस्त वाहनचालक, अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले, तोडलेले दुभाजक आणि रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण मार्ग अपघातप्रवण बनला आहे. गंभीर अपघातांपेक्षा किरकोळ अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र या किरकोळ दुर्घटनांची नोंद बहुतांश वेळा वाहतूक पोलिस विभागाकडे होत नाही. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उलट दिशेने येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण मोठे आहे. विशेषतः दुचाकीस्वार कोणत्याही दिशेने कसेही रस्ता ओलांडतात. अशास्त्रीय पद्धतीने दुभाजक तोडून निर्माण केलेल्या "वाटा' शोधून हे वाहनचालक स्वतःचा आणि इतर नागरिकांचाही जीव धोक्‍यात घालत असल्याचे पाहायला मिळते. बाह्यवळण मार्गावर येण्यासाठी काही भागांत असलेल्या सेवा रस्त्यांचीही दुर्दशा झालेली आहे. या सेवा रस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने जोड दिलेला नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडतात. 

कात्रज चौकाजवळच उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा; तसेच बस, ट्रक आणि अन्य वाहनांमुळे बाह्यवळण रस्त्याच्या सुरवातीलाच अनेकदा 

किरकोळ अपघाताच्या घटना घडतात. अभिनव संस्था, नवले पूल, सनसिटीकडे जाणाऱ्या जोडरस्त्याचा परिसर, वारजे येथील पॉप्युलरनगर, एचईएमआरएलचा परिसर, चांदणी चौक या ठिकाणी पादचारी अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना दिसतात. 

बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांकडे वारंवार 

पाठपुरावा केला आहे. मात्र "एनएचएआय'कडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या बाह्यवळण मार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नागरिकांची अपेक्षा 

  • बेकायदा पद्धतीने तोडलेले दुभाजक पुन्हा बंद करावेत 
  • उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरोधात सातत्याने कारवाई करावी 
  • भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई व्हावी 
  • मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या सेवा रस्त्याचा भाग समपातळीवर असावा 
  • बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि अन्य वाहनांवर कठोर कारवाई व्हावी
Web Title: Bypass became accidental