आंतरराष्ट्रीय मापदंडावर ‘सीए’चा अभ्यासक्रम - प्रफुल्ल छाजेड

prafull-chhajed
prafull-chhajed

पुणे - ‘वाणिज्यसह इतर शाखांमधील विद्यार्थी ‘सीए’च्या परीक्षेची तयारी करत आहेत. गुणवत्तावाढ व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृष्टिकोन प्राप्त व्हावा, यासाठी त्याच मापदंडावर अभ्यासक्रम तयार केला जात आहे,’’ असे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी सांगितले.

आयसीएआयच्या बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागातर्फे महालक्ष्मी लॉन्स येथे दोन दिवसीय परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १४) झाले. इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आर. एम. विशाखा, ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष अतुलकुमार गुप्ता, बोर्ड ऑफ स्टडीजच्या आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्ष केमिशा सोनी, उपाध्यक्ष दुर्गेश काब्रा, वंदना नागपाल, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ आनंद जाखोटिया, यशवंत कासार, पुणे शाखेच्या अध्यक्षा, परिषदेच्या समन्वयक ऋता चितळे आदी उपस्थित होते. 

छाजेड म्हणाले, ‘‘देशाच्या विकासात ‘सीए’ची भूमिका महत्त्वाची आहे. गुणवत्तेवर आधारित कोणीही या क्षेत्रात यश मिळवू शकतो. परीक्षाप्रक्रिया पारदर्शक आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये थेट सहभाग राहणार आहे, या भावनेने विद्यार्थ्यांनी ‘सीए’ क्षेत्रात यावे.’’

विशाखा म्हणाल्या, ‘‘सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासोबत आर्टिकलशिपही महत्त्वाची आहे. यामुळे प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. अभ्यासक्रमासोबत इतर ज्ञानही मिळवले पाहिजे. या क्षेत्रात काम करताना सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक काम करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com