नीट, जेईईच्या धर्तीवर 'सीए'चा अभ्यास; 10वी नंतरच फाउंडेशन कोर्सला नोंदणी शक्‍य

ca
ca

पुणे- वैद्यकीय पदवीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचा (आयआयटी) प्रवेश घेण्यासाठी 11वीपासूनच "नीट' किंवा "जेईई' या परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. त्याच पद्धतीने आता इयत्ता 12वी नंतर होणाऱ्या "सीए फाउंडेशन' परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभ्यास करता येणार आहे. हा निर्णय "इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत, अशा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे.

"सीए' होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वांत प्रथम फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. यासाठी विद्यार्थी 12वीत गेल्यानंतर नोंदणी करत आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर ते परीक्षा देत होते, त्यामुळे 12वीत परीक्षेची तयारी सुरू करतात. अनेक विद्यार्थ्यांना फाउंडेशन परीक्षेसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने परीक्षेत अपयश येते. त्यामुळे आता "आयसीएआय'ने त्यांच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी - कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने उचललं पाऊल

10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला "आयसीएआय'कडे नोंदणी करता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटतर्फे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध होईल. जे विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत, ज्यांना "सीए'साठी क्‍लास लावणे शक्‍य नाही अशांना "क्‍लाऊड कॅम्पस'च्या माध्यमातून ऑनलाइन क्‍लासेस उपलब्ध होतील.

"आयसीएआय'च्या पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा ऋता चितळे म्हणाल्या, ""इयत्ता 10वीनंतर विद्यार्थ्यांना सीएसाठी नोंदणी करता येईल. "आयसीएआय'शी जोडले गेल्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीतही बदल होईल,"नीट', "जेईई' या परीक्षांप्रमाणे सीए फाउंडेशनचा अभ्यास केल्याने त्याचा फायदा 12वीला होईलच शिवाय फाउंडेशन परीक्षा देतानाही होईल. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना क्‍लासेस, शिक्षक उपलब्ध होत नाहीत त्यांना याचा लाभ होऊ शकेल.''

पुणेकरांनो फक्त 5 रुपयांत फिरा; पीएमपीची दसऱ्यापासून खास भेट

11वी, 12वीच्या पुस्तकाच मर्यादित अभ्यासक्रम असल्याने अकाउंटच्या संकल्पना पूर्ण शिकवल्या जात नाहीत. पण फाउंडेशनचा अभ्यास करताना प्रत्येक संकल्पनेच्या मुळाशी जाऊन शिकल्याने अभ्यास चांगला होतो. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदाच होईल, असं विद्यार्थी मयूर राच्चा म्हणाला आहे.

- "सीए' फाउंडेशनचा अभ्यास दोन वर्ष करता येईल
- 12वीचा अभ्यासही चांगला होईल
- 10वीत असतानाच लक्ष निश्‍चित झाल्याने यश मिळण्याची खात्री वाढणार
- सीए फाउंडेशनला विद्यार्थी संख्या 30 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com