esakal | पावसामुळे पुण्यात कॅब दरात सहापटीने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

cab

पावसामुळे पुण्यात कॅब दरात सहापटीने वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: रात्री अपरात्री किंवा अडचणीच्या वेळी खासगी वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेल. पण आता ओला आणि उबेर या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही अडचणीच्या वेळी प्रवाशांची लूट करीत आहेत. शनिवारवाडा ते सहकारनगर या सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरासाठी एरवी १६० रुपये प्रवासी भाडे आकारणाऱ्या कॅबने तब्बल ६५० रुपयांची मागणी केली! त्यामुळे सर्द झालेल्या प्रवाशाने पावसात भिजतच घरी जाणे पसंत केले !

हेही वाचा: सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी

शहरात शनिवारी (ता.४) संध्याकाळी मुसळधार पाऊस होता. रात्री आठच्या सुमारास शनिवारवाडा ते सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनी या पाच किलोमीटर अंतरासाठी ओला, उबर टॅक्सीच्या दारांमध्ये काही पटीने वाढ झाल्याचे पहायला मिळाली. एरवी कॅबच्या टॅक्सीसा सुमारे १२० रुपये लागतात. मात्र पाऊस असल्यामुळे रात्री आठच्या सुमारास ६५० रुपयांची मागणी केल्याचा एका प्रवाशाच्या निदर्शनास आले. मागणी जास्त असल्यामुळे कॅब सरचार्ज आकारतात, हा अनुभव प्रवाशांना आहेच.

परंतु, तब्बल पाचपट जास्त भाडे आता आकारले जाऊ लागले आहे. ज्या प्रवाशाला ६५० रुपयांचा अनुभव आला त्याने कॅबने जाण्याऐवजी दुचाकीवरून पावसात भिजत घरी जाण्याचा पर्याय निवडला. पावसाच्या वेळी ओलाच्या कॅब आणि रिक्षानेप्रवाशांकडे पाठ फिरविली तर. तर उबरच्या रिक्षा उपलब्ध नव्हत्या अन कॅबसाठी भरमसाठ भाडे आकारणी केली.

हेही वाचा: सिंहगड : 150 ते 200 फूट उंच कड्यावर पर्यटकांचे जीवघेणे स्टंट

पाऊस असताना कॅबची गरज असते. मात्र, तेव्हाच सरचार्जच्या नावाखाली भरमसाठी आकारणी होत असल्याचा प्रवाशांचा अनुभव गुगलच्या प्ले स्टोअरवर संबंधित कॅब कंपन्यांच्या रिव्ह्यू सेक्शनमध्ये उमटला. तरीही ओला, उबरकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.

प्रवासी म्हणतात

“ओला कॅबसाठी वाट पाहताना, चार चालकांनी १५ मिनिटांनंतर फोन करुन कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली आणि १६ व्या मिनिटाला राईड रद्द केली. सहकार नगर ते गोखले नगरला जण्यासाठी मला चार ओला चालकांचा असा अनुभव आला आणि माझे २ तास वाया गेले. पाऊस असल्यावर उबरकडून नेहमीच्या दरांपेक्षा २५० ते ४०० रुपयांपर्यंत दर वाढवले जातात, हे चुकीचे आहे.” - वेदवती पैठणकर

“पुणे स्टेशन ते कोरेगाव पार्क या सुमारे चार किलोमीटर अंतरावर पाऊस सुरू असल्यामुळे दरात ४५० रुपयांची वाढ झाली. सामानाचे ४० ते ५० रुपये राईडच्या व्यतिरीक्त घेतले जातात आणि त्याच्या उल्लेख अॅपवर केला जात नाही. गरजेच्यावेळीच नेमके ओला आणि उबर कडून सहकार्य मिळत नाही याने ग्राहकांचा विश्वास कमी होत आहे.” – वैभव तेलखडे

loading image
go to top