औंध रूग्णालय कामगार वसाहतीत शॉर्टसर्किटमुळे केबल जळाली

रमेश मोरे
बुधवार, 11 जुलै 2018

जुनी सांगवी - औंध रूग्णालयाच्या कामगार वसाहतीत बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान येथील रहिवाशी भागातील सब डिपीतुन घरात विद्युत पुरवठा करणारी मुख्य वायर जळाल्याने वसाहतीतील शंभर घरांचा विद्युत पुरवठा बंद पडला. अचानक वायरने पेट घेतल्याने पहाटेच्या सुमारास नागरीकांची धांदल उडाली. 

स्फोटासारखा मोठा आवाज व वायरला लागलेल्या आगीमुळे नागरीकांमधे घबराट पसरली होती. सुदैवाने येथे कुठलीही हानी झाली नाही. तात्काळ स्थानिक रहिवाशांनी महावितरण कंपनीस कळविले. या भागातील सब डिपी.व परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. 

सकाळी महावितरण कर्मचा-यांकडुन येथील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. भल्या सकाळीच विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांची दैनंदिन कामे खोळंबुन राहिली.

अचानक मोठा आवाज झाला. आम्ही घाबरून रस्त्यावर आलो. तेव्हा खांबावरील वायर जळत होती. सगळीकडील लाईट बंद पडल्याने सर्वजण रस्त्यावर आले होते. सुकदेव चंडाले, रहिवाशी कामगार

विद्युत विभागाशी तात्काळ संपर्क करून येथील विद्युत पुरवठा बंद करायला सांगीतले.
जितेंद्र किरण लखन, रहिवाशी कामगार

माहिती समजताच येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. शॉर्टसर्किटमुळे अथवा केबल ब्रेक झाल्याने हा प्रकार घडला असावा. येथील दुरूस्तीचे काम सुरू आहे.

Web Title: Cables burnt due to short circuits in Aundh Hospital Workers' Colony