एनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

कोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या बिबट्याचा माग घेण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली आहे. तसेच, नागरिकांनी काळजी घ्यावे. असे आवाहन वन विभागाच्या वतीने केले आहे.

कोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या बिबट्याचा माग घेण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली आहे. तसेच, नागरिकांनी काळजी घ्यावे. असे आवाहन वन विभागाच्या वतीने केले आहे.

मागील आठवड्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दीत पाषाण गेट, त्रिशक्ती गेट, जलशुद्धीकरण केंद्र यासह चार पाच ठिकाणी बिबट्या दिसला आहे. प्रबोधिनीच्या आतील नागरिक व अहिरेगावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासानाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अहिरेगावच्या मोकरवाडी, सोनारवाडी, वांजळवाडी व खाडेवाडी असा परिसर आहे. या परिसरात शेतात बिबट्या दिसला असून ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच युवराज वांजळे देखील वन विभागाला पाठविलेल्या पत्रात खबरदारीचे उपाय करण्यास सांगितले आहे.

सोमवारी संध्याकाळी आहिरेगावाच्या बंधाऱ्याजवळ दोन बिबटे दिसल्याचा दावा. शिवसेनेचे विभागप्रमुख सागर शिर्के यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. ही माहिती मिळताच वन विभागाने या ठिकाणी एक पथक पाठविले आहे. त्यांच्याकडून बिबट्या कोणत्या भागात दिसला. त्या ठिकाणी जाऊन त्याच्या पायाचे ठसे मिळतात का, कोणत्या वन्य, पाळीव प्राण्याची शिकार केली आहे का, त्यासंदर्भात माहिती मिळविण्यात येत आहे. तसेच, प्रबोधिनीत नागरिकांच्या शेतात, गावात बिबट्या दिसल्याने येथे खबरदारी काय घ्यावी. याची माहिती देण्यात येणार आहे. असे वन विभागाने सांगितले. 
त्रिशक्ती गेट म्हणजे चांदनी चौक परिसर आहे. यामुळे या परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. असे ही वन विभागाने सांगितले. 

खबरदारी काय घ्यावी
"नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये. पहाटे व संध्याकाळी अंधार असताना शेतात किंवा घराबाहेर जाऊ नये, मुलांना एकटे सोडू नये. अशी काळजी घ्यावी."
- महेश भावसार, सहाय्यक उपवनसंरक्षक 
 

Web Title: Cage for leopard in NDA area