
विज्ञानाचा रोजच्या जगण्यातील उपयोग समजण्यासाठी लहान मुलांच्या विशेष कार्यशाळांचे आयोजन ‘सकाळ’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने केले आहे.
मुलांसाठी ‘सकाळ’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने शिबिरांची पर्वणी
पुणे - विज्ञानाचा (Science) रोजच्या जगण्यातील उपयोग समजण्यासाठी लहान मुलांच्या विशेष कार्यशाळांचे (Special Workshop) आयोजन ‘सकाळ’ (Sakal) आणि ‘संडे सायन्स स्कूल’च्या (Sunday Science School) वतीने केले आहे. यामध्ये चार दिवसीय विज्ञान तंत्रज्ञान कार्यशाळा, रोबोटिक्स कार्यशाळा आणि एका आकाशनिरीक्षण शिबिराचाही समावेश आहे.
रोबोटिक्स कार्यशाळेत रोबोटचे तंत्र, प्रकार व उपाययोजना आदी मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे पाच रोबोट बनविणार आहे. सर्व कार्यशाळांमध्ये मुलांना कायमस्वरूपी साहित्य मिळणार आहे. या दोन्ही कार्यशाळा पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सहा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करता येणार आहेत. तसेच, ऑनलाइन पद्धतीने घरी किट्स येऊन व्हिडिओ व मीटिंगच्या मदतीनेदेखील करता येणार आहेत.
आकाशनिरीक्षण शिबिर
दोन रात्र व दोन दिवस निवासी आकाशनिरीक्षण शिबिराचे आयोजन अहमदनगरजवळ स्पेस ओडिसी तारांगण येथे केले आहे. या शिबिरात आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्र-राशी, ध्रुव तारा शोधणे, राशी समूह ओळखणे आदी पद्धतींची ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच, उच्च क्षमता असणाऱ्या दुर्बिणीतून विविध ग्रह, देवयानी आकाशगंगा, तारकासमूह, चंद्र यांचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थी विविध प्रकारच्या दुर्बिणी प्रत्यक्ष हाताळणार आहेत. या सर्व उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी - ९३७३०३५३६९, ९८५००४७९३३, ८७७९६७८७०९.
विज्ञान-तंत्रज्ञान कार्यशाळा
कालावधी - ३० एप्रिल ते ३ मे - दररोज २ तास
शुल्क - १४५० (छोटा गट) व १५०० (मोठा गट)
प्रवेशाची अंतिम तारीख - २७ एप्रिल २०२२
आकाशनिरीक्षण निवासी शिबिर
कालावधी - ४ ते ६ मे
शुल्क - ३५०० रुपये
प्रवेशाची अंतिम तारीख - ०१ मे २०२२
रोबोट बनविण्याची कार्यशाळा
कालावधी - १० मे ते १३ मे - रोज २ तास
शुल्क - २२०० रुपये
प्रवेशाची अंतिम तारीख - ०६ मे २०२२
Web Title: Camp By Sakal And Sunday Science School Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..