भाजप नगरसेवकांत पदांसाठी चढाओढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) संचालक मंगळवारी (ता. ३) राजीनामे देणार आहेत. त्यानंतर लगेचच सभागृहनेत्याची निवड करण्यात येणार आहे. मात्र, स्थायी समिती आणि ‘पीएमपी’च्या संचालकपदाच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात होईल. दरम्यान, या पदांवर वर्णी लागण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांत चढाओढ लागली आहे.

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) संचालक मंगळवारी (ता. ३) राजीनामे देणार आहेत. त्यानंतर लगेचच सभागृहनेत्याची निवड करण्यात येणार आहे. मात्र, स्थायी समिती आणि ‘पीएमपी’च्या संचालकपदाच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात होईल. दरम्यान, या पदांवर वर्णी लागण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांत चढाओढ लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे या पदावर सलग पावणेतीन वर्षे राहिल्याने त्यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षनेतृत्वाने दिला आहे. तर, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि ‘पीएमपी’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने महापालिकेतील त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात येणार आहे. त्यानुसार या तिघांनाही आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागणार असून, त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल, असे पक्षाच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाची निवडीसाठी विभागीय आयुक्तांमार्फत निवडणुकीची प्रक्रिया केली जाईल. तसेच, ‘पीएमपी’च्या संचालकपदाचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Campaign for BJP councilors politics