महिलांना उद्योजक बनविण्यासाठी मोहिम हाती घेणार - सौ. सुनंदा पवार

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अंतर्गत शारदा महिला संघ आणि शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार
महिलांना उद्योजक बनविण्यासाठी मोहिम हाती घेणार - सौ. सुनंदा पवार
Summary

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अंतर्गत शारदा महिला संघ आणि शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार

माळेगाव - अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अंतर्गत शारदा महिला संघ आणि शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय संबंधित महिलांसाठी यापुढे नियमित आरोग्य तपासणी मोहिम आणि त्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याचे काम होणार आहे. अर्थात हे कार्य पहिल्या टप्प्यात बारामती, इंदापूर, पुरंदर आणि कर्जत जामखेड भागातील महिलांसाठी उभे करण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी स्पष्ट केली.

शारदानगर (ता.बारामती) येथे अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत नव्याने उभारलेल्या शारदा महिला संघ कार्यालयाचे, तसेच शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बचत गटासाठी उत्पादन विक्री केंद्र सुरू करण्यासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, कर्जत आणि जामखेड  या तालुक्यांमध्ये काम सुरू झाले आहे, असे सांगून सौ. पवार म्हणाल्या,' महिलांना उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण देणे खूप महत्वाचे आहे. महिलांनी यापुढे स्वतःमधील कला ओळखून यशस्वी उद्योजक बनण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी शारदा महिला संघ आणि शारदा महिला पतसंस्था सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.' यावेळी सौ. पवार यांच्या हस्ते इंदापूर, बारामती, पुरंदर येथील 7 बचत गटांना विविध व्यवसायासाठी 13 लाख 50 हजार रुपये कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करण्यात आले.

तत्पुर्वी बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल म्हणाले, की आता पालखीमध्ये बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची स्टॉल लावण्यासाठी महिलांची तयारी असेल तर आम्ही जागा देण्याचे नियोजन करत आहोत. त्या ठिकाणी महिला आपली उत्पादने स्टॉलच्या माध्यमातून विक्री करू शकतात. कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी महिला बचत गटांबरोबर प्रत्येक महिलांनी कृषी विभागाच्या विविध योजना लाभ घ्यावा, त्यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करेल असे सांगितले.

व्याख्याते गणेश शिंदे यानी महिलांना उत्पादने व बाजार पेठतील मागणी याबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) मिलिंद टकसाळे यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी प्रशिक्षक सविता पावसकर, लेखा परिक्षक रामकृष्ण गुरव, दत्ता गार्गी, आदी मागन्यवर उपस्थित होते. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब नगरे, प्रकाश साळुंके, गजानन मोकाशी, निकिता म्हणुनी अभिषेक जगताप, तात्या शेलार, प्रतिक्षा पवार व महिला संघाच्या सेविकांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com