Loksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामतीत प्रचारफेरीचे आयोजन

मिलिंद संगई,
रविवार, 7 एप्रिल 2019

बारामती  : लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज शहरात प्रचारफेरीचे आयोजन केले गेले. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज ही प्रचार फेरी काढण्यात आली. 
 

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज शहरात प्रचारफेरीचे आयोजन केले गेले. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज ही प्रचार फेरी काढण्यात आली. 

सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात या मतदारसंघाच्या विकासासाठी जे भरीव काम केलेले आहे, ते काम नजरेसमोर ठेवून बारामतीकरांनी पुन्हा एकदा ताईंना संधी द्यावे असे आवाहन सुनंदा पवार यांनी या वेळेस केले. 

प्रभाग दहा, अकरा व एकोणीसमधील प्रचाराचा प्रारंभ कसब्यातील काशीविशेश्वर मंदिरापासून करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव यांच्यासह माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जयश्री सातव तसेच संभाजी होळकर, शिवाजीराव ढवाणपाटील, दिलीप ढवाणपाटील, इम्तियाज शिकीलकर, सुभाष ढोले, सूरज सातव,  डॉ.सुहासिनी सातव,  संतोष जगताप, रुपाली गायकवाड, अल्ताफ सय्यद, गणेश सोनवणे, सत्यव्रत काळे, सिद्धनाथ भोकरे,  तरन्नुम सय्यद, विजय खरात, अनिता गायकवाड, अमर धुमाळ, आसिफ बागवान, साधू बल्लाळ तसेच कसबा येथील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Campaigning for Supriya Sule in Baramati