लोकनृत्य पाहून कॅनडाचे पाहुणे भारावले (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 50 लाख रूपयांचा साहित्यांचा खर्च या परीसरातील विद्यार्थ्यांवर करण्यात आला असल्याचे रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील मलठण परीसरातील जिल्हा परीषदेच्या शाळांचा सर्व्हे करून गोरगरीब विद्यार्थी निवडण्यात आले होते. कॅनडा येथील स्लीपींग चिल्ड्रन आराऊंड द वर्ल्ड या संस्थेमार्फत स्लीपींग किट देण्यात आले. यासाठी या संस्थेचे ख्रिस हिल्स, ज्युडी स्नोबेलेन, केयो हिल्स, अॅन्डी ग्रेनूर, अयॅन बॅारेक, कॅधी, लिटा हे परदेशी पाहुणे उपस्थीत होते. या किट मध्ये तब्बळ 42 साहित्य देण्यात आले होते. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगली झोप लागली तर त्यांचा उत्साह वाढेल व हसत खेळत नवीन पिढी निरोगी तयार होईल, या उद्देशाने हे साहित्य विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. या विद्यार्थ्यांची यावेळी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. मोफत चष्मे व शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. परदेशी पाहुण्यांनी मुलाचे छायाचित्रण करत त्यांच्याशी हस्तांदोलन करत हसा मुलांनो हसा... असा काहीसा आग्रह धरला होता.

या कार्यक्रमाचे संयोजन पुणे रोटरी कल्बचे पंकज आपटे, वैभव पोर, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गावडे व शिक्षक युवराज थोरात यांनी केले होते. यासाठी ग्रामस्थ व तरूण मंडळाचे सहकार्य मिळाले.

Web Title: Canadians seeing students folk dance at shirur taluka pune