बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं

बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं

पुणे : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांकडून देण्यात आलेला आहे. (Corona) एवढेच नव्हे तर ही लाट विशेषकरून तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षांचा (Offline Examination) घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे यंदा बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्‌स असोसिएशनतर्फे वारंवार केली जात आहे. मात्र, या मागणीला राज्य सरकारकडून योग्य दाद मिळत नसल्याने आता असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (letter to PM Narendra Modi) यांना पत्र पाठविले असून परीक्षा रद्द व्हावी, यासाठी त्यांच्याकडे साकडे घातले आहे. कोरोनाची तिसरी लाट तोंडावर असताना देशात अद्यापही १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच राज्यातील सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे लसीकरणही पूर्ण झाले नाही. असे असताना ऑफलाइन परीक्षा घेणे हे धोक्याचे आहे, असे असोसिएशनने मागणीच्या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारकडून बारावीच्या परीक्षेबाबत कोणतीही सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने विद्यार्थी-पालक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. (Cancel the twelfth HSC exam Parents organizations urged Prime Minister)

बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं
भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेणे हे सद्यस्थितीत शक्य नाही. तसेच परीक्षांना अजून उशीरा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे. करणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासात ढकलण्यासारखे असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी बारावीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासाच्या आधारे आता दहावीच्या निर्णयाप्रमाणे बारावीसाठीही अंतर्गत मूल्यमापनाच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे पालकांचे म्हणणे आहे. देशभरातील अनेक विद्यापीठांनी यंदा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्याचे ठरविले आहे. त्या धर्तीवर बारावीच्या परीक्षेबाबतही निर्णय घेणे शक्य आहे, असा पर्याय पालकांनी सूचविला आहे.

निर्णय लवकर घेणे गरजेचे

‘‘बारावीची परीक्षा आणखी पुढे ढकलण्यास पुढील शैक्षणिक वर्ष, प्रवेश प्रक्रिया, नवीन अभ्यासक्रमाची सुरवात याचे वेळापत्रक विस्कळीत होईल. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा आणखी पुढे ढकलणे योग्य ठरणार नाही. त्याएवजी दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या पर्यायाचा विचार व्हायला हवा. बोर्डाच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने सध्या बारावीचे विद्यार्थी तणावात आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.’’

- अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाईड पॅरेंट्‌स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com