वंचितच्या उमेदवाराने केली निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

Candidate of Vanchi Bahujan Aghadi conplaints presiding officer at Khadaki Pune
Candidate of Vanchi Bahujan Aghadi conplaints presiding officer at Khadaki Pune

खडकी बाजार (पुणे) : येथे चौदा केंद्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 25.4 टक्के मतदान झाले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिनिधी कुमुदिनी वानखेडे यांनी खडकीत सर्वच ठिकाणी बूथ हे पक्षांच्या झेंड्याच्या रंगाने बनवण्यात आले असून स्लीपवर पक्षाचे चिन्ह उमेदवारांचे नावे वापरात येत असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खडकीत सकाळपासून शांततेत मतदान सुरू होते. मतदान केंद्रापासून ठराविक अंतरावर वाहने न थांबवता थेट निवडणूक केंद्रापर्यंत वाहने नेण्यात येत होती. खडकी बोर्डाचे सदस्य एक गठ्ठा मतदारांना घेऊन केंद्रावर जात असतानाच कर्नल भगत शाळेतील केंद्रावर दिसत होते.

पोलिसांची कुमक कमी पडत असल्यामुळे दुपारी बारावाजेपर्यंत अनेक केंद्रावर असे प्रकार घडत होते. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खडकीत पोलिस दक्ष झाले होते.

खडकीत एकूण चौदा मतदान केंद्रामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत महिला पुरुष असे एकूण 2.46 टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरा वाजता हा आकडा 7.34 टक्क्यांवर आला, दुपारी एक वाजता 16.5 टक्के, तर दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण महिला पुरुष मिळून 25.4 टक्के मतदान झाल्याची माहिती झोनल ऑफिसर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com