अनुकूल प्रभाग मिळविण्यासाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुणे : अंतिम प्रभागरचना जाहीर होईपर्यंत सावधपणे पावले टाकणाऱ्या इच्छुकांनी आता प्रभागांची अदलाबदल करीत आपल्याला अनुकूल प्रभाग पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू केली आहे.

उर्वरित इच्छुकांनी प्रभागात बदल न झाल्याने सुटकेचा नि:श्‍वास सोडत धडाक्‍यात प्रचाराला प्रारंभ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येण्याची शक्‍यता आहे.

पुणे : अंतिम प्रभागरचना जाहीर होईपर्यंत सावधपणे पावले टाकणाऱ्या इच्छुकांनी आता प्रभागांची अदलाबदल करीत आपल्याला अनुकूल प्रभाग पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू केली आहे.

उर्वरित इच्छुकांनी प्रभागात बदल न झाल्याने सुटकेचा नि:श्‍वास सोडत धडाक्‍यात प्रचाराला प्रारंभ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येण्याची शक्‍यता आहे.

सिंहगड रस्त्यावरील प्रभाग 33 (वडगाव धायरी-वडगाव (बु.) आणि प्रभाग 34च्या (सिनसिटी-हिंगणे खुर्द) रचनेत मोठा बदल झाल्याने येथील इच्छुकांनी प्रभाग बदलला आहे. हा बदल अनुकूल असल्याचे सांगत, भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक प्रभाग 34 मधून आपला हक्क सांगत आहेत. प्रभाग 20 (ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल) आणि प्रभाग 21च्या (कोरेगाव पार्क- घोरपडी) रचनेतही बदल झाला आहे. या बदलामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेसंदर्भात नागरिकांच्या हरकतींनंतर शहरातील 41पैकी 16 प्रभागांच्या रचनेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. महिनाभरापूर्वी प्रभागरचना जाहीर होऊनही प्रभागरचनेबाबत इच्छुकांमध्ये धाकधूक होती. नेमके कोणते बदल होणार, याचा अंदाज नसल्याने काही इच्छुक प्रभागनिवडीबाबत साशंक होते. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, ज्या प्रभागांमध्ये बदल झालेला आहे तो लक्षात घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. सिंहगड रस्त्यावरील भाजपच्या एका इच्छुकाने शेजारच्या प्रभागातून तिकिटाची मागणी करणार असल्याचे सांगितले.

निम्म्याहून अधिक प्रभागांच्या रचनेत कोणताही बदल झाला नसल्याने येथील इच्छुकांनी प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे टप्पेही ठरविण्यात येत आहेत. या पुढील काळात प्रचाराला वेग येणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

"प्रभाग 33 नव्हे 34 द्या'
भाजपचे सिंहगड रस्त्यावरील इच्छुक युवराज कुदळे म्हणाले, ""आधी प्रभाग 33मधून तिकिटाची मागणी केली होती; परंतु रचनेत बदल झाल्याने प्रभाग 34 अनुकूल झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून तिकिटाची मागणी करणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

Web Title: Candidates trying to get suitable ward to contest elections in Pune Municipal Corporation Elections