स्थानिक राजकारणावर ठरणार उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

स्थानिक राजकारणावर उमेदवार ठरू शकतील, अशी चिन्हे धनकवडी-आंबेगाव पठार या प्रभागात (क्र. 39) दिसून येत आहे. स्थानिक आमदारांचा मुलगा आणि पुतण्या, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, बांधकाम व्यावसायिक आदी या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

स्थानिक राजकारणावर उमेदवार ठरू शकतील, अशी चिन्हे धनकवडी-आंबेगाव पठार या प्रभागात (क्र. 39) दिसून येत आहे. स्थानिक आमदारांचा मुलगा आणि पुतण्या, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, बांधकाम व्यावसायिक आदी या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

धनकवडी, आंबेगावातील मूळ ग्रामस्थ आणि नव्याने राहावयास आलेले, असे सुमारे 82 हजार मतदार या प्रभागात आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे आणि नगरसेविका मोहिनी देवकर यांच्या जुन्या प्रभागातील संपूर्ण भाग, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवलाल भोसले आणि भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या जुन्या प्रभागातील सुमारे 70 टक्‍क्‍यांहून अधिक भाग या प्रभागात समाविष्ट झाला आहे. कात्रज-आंबेगाव परिसरातील सुमारे 30 टक्के भाग या प्रभागाला जोडला गेला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे येथील आरक्षण आहे. 

नव्याने तयार झालेल्या या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तांबे, देवकर आणि भोसले नगरसेवक आहेत, तर भाजपच्या नगरसेविका तापकीर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या भागात आमदार मात्र भाजपचे भीमराव तापकीर आहेत. या परिसरातून दोन वेळा ते निवडून आले आहेत. त्यांचा मुलगा आणि पुतण्या यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. तर, शिवसेनेनेही संघटनात्मक बांधणीवर लक्ष दिल्यामुळे त्यांच्याकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. कॉंग्रेसचा या भागात परंपरागत मतदार असून त्यावर त्यांचा उमेदवार ठरणार आहे. मनसेही आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रभागात धनकवडी आणि गावठाण, आंबेगाव पठार, चैतन्यनगर, मोहननगर, तीन हत्ती चौक, राऊत बाग, राघवनगर, त्रिमूर्ती चौक इत्यादी परिसर आहे. गावठाण आणि वस्ती भाग सुमारे 30 टक्के असून 70 टक्के सोसायट्या आहेत. त्यात नवमतदारांची संख्या वाढली आहे. मूळचे ग्रामस्थ आणि नव्याने राहावयास आलेले नागरिक, असा संमिश्र मतदार आहे. त्यामुळे गट-तट असल्यामुळे स्थानिक राजकारण येथेही रंगते. नव्या-जुन्या मतदारांचे प्रमाण लक्षात घेऊन समतोल उमेदवार ठरविणार असल्याचे सर्वच राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले. प्रमुख पक्षात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे या प्रभागात ऐनवेळी एखादे पक्षांतरही होऊ शकते किंवा अनपेक्षित उमेदवार रिंगणात उतरू शकतात, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे. 

प्रमुख इच्छुक उमेदवार 

- राष्ट्रवादी कॉंग्रेस ः विशाल तांबे, मोहिनी देवकर, किशोर ऊर्फ बाळासाहेब धनकवडे, किरण परदेशी, प्रीती फरांदे, निकिता पवार, चंद्रकांत गोरे, सुवर्णा चव्हाण, गौरी जाधव, सुनील खेडेकर, विकास चव्हाण, जयश्री पाटील 

- भाजप ः वर्षा तापकीर, गणेश भिंताडे, अभिषेक तापकीर, रोहण तापकीर, अप्पा धावणे, विश्‍वास आहेर, दीपक माने, निहाल घोडके, समीर घोलप, अंजली घोलप, सचिन बदक, सचिन ऊर्फ पप्पू घोलप, चंद्रकांत चौधरी, महेश भोसले, भूपेंद्र गोसावी, रवी कांबळे 

- शिवसेना ः अनिल बटाणे, योगेश पवार, सचिन धुमाळ, दीपक जाधव, सायली जगताप, नेहा कुलकर्णी, मालण गवळी, प्रल्हाद कदम, प्रा. किसन बोराटे, विजय क्षीरसागर, अनिता धुमाळ, प्रिया बोराटे, शुभदा मुडवीकर, मंगल सोकांडे, वैशाली गोगावले 

- कॉंग्रेस ः दिलीप दोरगे, प्रशांत जाधव, डॉ. क्रांती हंबीर, मनोज आणेराव, मयूर आहेर, कल्पना उणावने, अनिल भोसले 

- मनसे ः चंद्रकांत गोगावले, ऋषी सुतार, ज्योती कोंडे 

- अन्य ः अप्पा परांडे, अश्‍विनी भागवत 

Web Title: Candidates will be local politics