उन्नाव, कठुआ घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च

कृष्णकांत कोबल
शनिवार, 14 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : उन्नाव व कठुआ येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महादेवनगर येथे महिला व विद्यार्थिनींनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने त्याचे संयोजन करण्यात आले होते.

महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचीटणीस भारती कोंडे, वंदना सातपुते, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा  सिमा सावंत, शहर उपाध्यक्षा इंदिरा आहीरे  माजी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी नलावडे, हवेली तालुकाध्यक्षा संजीवनी कोंडे, अलका गायकवाड यांच्यासह परिसरातील मोठ्या प्रमाणातील महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. हातात मेणबत्ती व पोस्टर घेऊन महिलांनी माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध केला.

सिमा सावंत म्हणाल्या,"मुली व महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. प्रशासनाने त्याबाबत विशेष गांभीर्याने घेऊन अशा घटनांना आळा घातला पाहिजे. महिलांनीही त्याविरुद्ध चळवळ उभारली पाहिजे. उन्नाव व कठुआ येथील घटनेची सखोल चौकशी करून त्यामधील सहभागींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."

Web Title: candle march against unnav and kathua rape cases