विविध प्रकारच्या टोप्यांची गमतीदार गोष्ट (व्हिडिओ)

नीला शर्मा
शनिवार, 25 मे 2019

विदुलाताई गोष्ट सांगत होत्या. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे शेफ, हवालदार, अग्निशामक दलाच्या टोप्या भराभर बनवत होत्या. मुलं एकाग्रतेनं पाहात होती, की एकाच कागदाच्या दोन-तीन घड्या बदलून पुढची टोपी कशी तयार होते.

पुणे - विदुलाताई गोष्ट सांगत होत्या. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे शेफ, हवालदार, अग्निशामक दलाच्या टोप्या भराभर बनवत होत्या. मुलं एकाग्रतेनं पाहात होती, की एकाच कागदाच्या दोन-तीन घड्या बदलून पुढची टोपी कशी तयार होते.

सारस बागेसमोरच्या गरवारे बालभवनमध्ये तिथल्या विदुलाताईंच्या सभोवती छोटी मुलं बसली होती. विदुलाताई त्यांना एक रंजक गोष्ट सांगत होत्या.

त्यांच्या हातात मोठ्या आकाराचा कागद होता. त्याच्या घड्या पटापट बदलत विदुलाताई गोष्टीतल्या वर्णनानुसार नव्या तऱ्हेची टोपी बनवत होत्या. त्यांच्या गोष्टीतला श्‍लोक नावाचा मुलगा रत्नागिरीत घरच्या भातशेतीत काम करायचा. ‘‘पावसात तो डोकं आणि पाठीचं संरक्षण करणारं इरलं घालायचा,’’ असं म्हणता म्हणता इरलं तयार झालं. ते त्यांनी शेजारी बसलेल्या श्‍लोक नावाच्या मुलाला घातलं. मग त्याच्या घड्या बदलत बावर्ची (शेफ), किराणा दुकानदार, सावकार, अग्निशामक दल, हवालदार आदींच्या टोपीमध्ये त्याचं रूपांतर होत गेलं. नंतर बोट तयार झाली. ती खडकावर आपटून फुटली. श्‍लोकनं मग लाइफ जॅकेट कसं तयार केलं आणि आपला जीव वाचवला, हे मुळातून ऐकायला हवं... ही गोष्ट ऐकताना रंगलेल्या मुलांनी या गोष्टीतल्या टोप्या शिकून घ्यायचं ठरवलं आहे. ऊन लागू नये म्हणून स्वतःसाठी कागदी टोप्या तयार करणं आणि मित्रांना ही कला या गोष्टीसकट शिकवायचा निश्‍चय त्यांनी बोलून दाखवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cap Magic Story

टॅग्स