कॅप्टन अमित काळे यांची श्रीलंकेमधील प्रशिक्षणासाठी निवड

राजकुमार थोरात
सोमवार, 30 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता.इंदापूर ) येथील भारतीय सैन्य दलामध्ये असलेले अधिकारी कॅप्टन अमित दिलीपराव काळे यांची श्रीलंका या देशात विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

लासुर्णे मधील प्राथमिक शिक्षक दिलीपराव काळे व शिक्षीका सुशिला काळे  यांचे अमित काळे हे चिरंजीव आहेत. अमित काळे युपीएससी च्या मार्फत घेण्यात आलेल्या एन.डी.ए.च्या परीक्षेत राज्यात पहिले व देशात नववे आले होते . सन 2015 साली भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर त्यांची नियुक्त झाली होती. त्यांच्या उत्कृष्ठ  कामगिरी मुळे त्यांना कॅप्टन या पदावर बढती मिळाली आहे.   

 देशाच्या संरक्षण खात्यातामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात आहे.  अमितच्या निवडीने ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन मिळत अाहे. इंदोर येथ भारतीय सैन्य दलातील 200 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होते.  

गेल्या दोन वर्षामध्ये व इंदोर मधील प्रशिक्षणामध्ये अमितने उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त  केली असून त्यांची भारतीय संरक्षण दलाने 200 अधिकाऱ्यामधून श्रीलंका येथे होणा-या विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. सदर प्रशिक्षणासाठी अमित काळे हे 7 मे ला श्रीलंकेमध्ये  जाणार असल्याचे दिलीप काळे यांनी सांगितले. 

Web Title: captain amit kale selected for training in shrilanka