स्कॉर्पिओ चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद

संदीप घिसे
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पिंपरी : 'इग्नेशन स्वीच'च्या वायरिंग मध्ये बदल करून आलिशान मोटारी चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या टोळीने पिंपरीगाव येथून शनिवारी (ता. 13) मध्यरात्री स्कॉर्पिओ जीप चोरून नेली. राहुल अशोक घोडेस्वार (वय 30, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चोरणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांनी शुक्रवारी (ता. 12) सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरासमोर पार्किंगमध्ये स्कॉर्पिओ पार्क केली होती. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना पार्किंगमध्ये स्कॉर्पिओ नसल्याचे दिसून आले. फिर्यादी राहुल आणि त्यांचे नातेवाईक विजय बानायत यांनी स्कॉर्पिओची शोधाशोध केली. मात्र, स्कॉर्पिओ मिळून न आल्याने त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत. 

Web Title: Capture of Scorpio thieves in CCTV