पुण्यात विचित्र अपघातात दोघांचा मृत्यु; दोघे जखमी

accident
accident

पुणे : भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकुन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर पडलेल्या मोटारीला टेम्पो ट्रव्हलरने धडक दिली. या भीषण अपघातात मोटारीमधील दोनजण जागीच ठार झाले, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 22) मध्यरात्री दीड वाजता पुणे विद्यापीठ ते औंध दरम्यानच्या रस्त्यावर घडली.

प्रतीक प्रमोद रामशेट्टीवर (वय 29, रा. चंद्रपुर) याच्यासह अन्य एकाचा मृत्यु झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. डी. दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता एक मारुती सुझुकी मोटारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरुन औंधच्या दिशेने जात होती. त्यामध्ये चारजण होते. कस्तुरबा वसाहतीजवलील केंद्रीय विद्यालयासमोर मोटारीचालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटारी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन आदळली. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रव्हलरने अपघातग्रस्त मोटारीला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत मोटारीमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चतुश्रृंगी पोलिस तत्काळ घटनेच्या ठिकाणी गेले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान या अपघातामुळे औंधवरुन पुणे विद्यापीठकडे आणि विद्यापीठकडुन औंधकडे येणारी वाहतुकीची कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com