मोटार खरेदी ट्रेंड कायम

Vehicle-Purchasing
Vehicle-Purchasing

पुणे - लॉकडाउननंतरच्या काळात शहरात निर्माण झालेला मोटारी खरेदीचा ट्रेंड कायम असून, यंदा तर गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबरपेक्षा जास्त मोटारींचा खप शहरात झाला आहे. अन्य वाहनांचा खप कमी असताना मोटारी मात्र सुसाट धावत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक मोटारींचा वापर करू लागले आहेत. स्वतंत्र वाहनाने फिरलेले बरे, अशी भावना नागरिकांत आहे. तसेच बाहेरगावी जाण्यासाठी एसटी किंवा रेल्वेपेक्षा स्वतःच्या मोटारीने जाण्याचेही प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी व्यक्त केली. ‘आरटीओ’ कार्यालयातील नोंदींनुसार गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक मोटारी ऑक्‍टोबरमध्ये विकल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोटारींचा खप वाढण्यासाठी वितरकांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. त्यातच कार लोनसाठी वित्तसंस्था आणि बॅंकांनीही कमी व्याजाचे आकर्षक पर्याय ग्राहकांसाठी खुले केले आहेत. त्यामुळेही मोटारींचा खप वाढत आहे. धनकवडीमध्ये राहणारे आणि पिंपरीला एका खासगी कंपनीत दररोज कामावर जाणारे आशुतोष जाधव म्हणाले, ‘‘या पूर्वी कंपनीची बस किंवा पीएमपीच्या बसमधून मी कामावर जात होतो. सध्याच्या काळात हे दोन्ही पर्याय भीतीदायक वाटतात. त्यामुळे आता सीएनजीवर धावणारी वॅगन- आर मोटार घेऊन रोज ऑफिसमध्ये जात आहे.

इतरांच्या संपर्कात न येता स्वतंत्रपणे प्रवास करता येत असल्यामुळे मोटार सोयीची वाटते. त्यामुळेच मी नुकतीच खरेदी केली.’’ मोटारींच्या तुलनेत दुचाकी, मालवाहतूक करणारी वाहने, बस आदींचा खप मर्यादित आहे. दीपावलीच्या काळात वाहन खरेदीचा खप अजून वाढेल, असाही अंदाज भोर यांनी वर्तविला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com