भाड्याने घेतलेल्या 76 कारचा अपहार; काय आहे प्रकार वाचा सविस्तर

भाड्याने घेतलेल्या 76 कारचा अपहार; काय आहे प्रकार वाचा सविस्तर

पुणे ः वाहने भाडेतत्त्वावर घेऊन एका टोळीने तब्बल 76 कारचा अपहार केल्याची बाब पोलिस येरवडा पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. कराराप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना गाडी भाड्याने न देता त्या अवैधपणे दारू वाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आशिष गंगाराम पुजारी (वय 32, रा.पालघर), सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा (30,रा.वसई, पालघर) आणि अयान ऊर्फ राहुल ऊर्फ अन्थोनी पॉल छेतीयार (38,रा.मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींचे साथीदार हैदलअली आलंदार हुसेन सय्यद (रा.लोहगाव,पुणे), सादिकेत अकबर अहमद (रा. ठाणे) आणि मुन्ना चाचा (पूर्ण नाव नाही) हे तीनजण पसार झाले आहेत. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात श्रीधर मुरलीधर जगताप (वय 30, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हैदरअली सय्यद याने त्याच्या साथीदारांसह येरवड्यातील प्रतीकनगर येथे द सिटी ट्रॅव्हल्स नावाने कंपनी सुरू केली. आरोपींनी जगताप यांची इनोव्हा कार व इतर साक्षीदारांच्या स्विफ्ट डिझायर, इर्टिगा, इन्होवा, एक्‍सेंट अशी वेगवेगळी 75 वाहने करार करून भाडेतत्त्वावर घेतली. मात्र, करारात ठरल्याप्रमाणे भाड्याची रक्कम दिली नाही. तसेच वाहने सरकारी अधिकाऱ्यांना भाड्याने न देता अवैध दारू वाहतुकीसाठी वापरले. संबंधित गाड्या मूळ मालकांना परत न करता त्यांचा अपहार केला.

रॅकेट सक्रिय असल्याची शक्‍यता ः
पोलिसांनी आरोपींकडे संबंधित वाहनाबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील वाहने जप्त करावयाची आहे. अशा प्रकारे गुन्हे करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे तर आरोपीं विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे नेरुळ पोलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे, असे पोलिस रिमांडमध्ये नमूद आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे करीत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com