खेकड्यांची मागणी वाढली; चिंबोरी खेकडा 550 रुपयांवर

crab
crab

पुणे : गेल्या काही दिवसात खेड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. खाडी-चिंबोरा खेकडा हा 550 रुपये प्रतीकिलो प्रमाणे बाजारात विकला जात आहे.

पावसाळा सुरू झाला की खेकड्याची मागणी वाढते. पावसाळ्यात खेकड्या पासून ज्यूस करून पिला जातो. खेकड्याचा ज्यूस शरारसाठी आरोग्यदायी असल्याने त्याची मागणी जास्त पावसाळ्यात जास्त असते. तसेच अनेकजण खेकड्याचे कालवण बनवून देखील खातात. तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटले असल्याचे व्यक्त केल्याने गेल्या काही दिवसांत खेकड्याला चांगलेच डिमांड आले आहे.

बाजारात सध्या खाडीतून येणार चीनंबोरी खेकडा ५५० रू प्रती किलो विकला जातो आहे. तर, खोल समुद्रातील - लाल खेकडा २४० - २८० , ओढा आणि नदीतील चॉकलेटी खेकडा २००-२४० प्रतीकिलो प्रमाणे विकला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. काही व्यापारी खेकडा डझनावर देखील विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com