‘देवदूत’ची देखभाल महापालिकेकडे घ्यावी! चौकशी समितीचा अहवाल

ज्ञानेश सावंत
Friday, 30 October 2020

आपत्तीमध्ये पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘देवदूत’ योजनेतील वाहनांमध्ये निविदेतील ‘स्पेसिफिकेशन’नुसार सुरक्षिततेची साधने नाहीत, असा अहवाल महापालिकेच्या चौकशी समितीने दिला आहे. या वाहनांची इंजिन क्षमता कमी, फायर फायटिंग यंत्रणा स्टेनलेस स्टीलऐवजी प्लॅस्टिकची आहे. तसेच, वाहनांची रुफ लाइट बॅटरीवर नव्हे तर जनरेटरवर असल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. ही योजना ठेकेदाराऐवजी महापालिकेनेच राबवावी; ज्यामुळे पुणेकरांचे पैसे वाचणार असल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले.

पुणे - आपत्तीमध्ये पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘देवदूत’ योजनेतील वाहनांमध्ये निविदेतील ‘स्पेसिफिकेशन’नुसार सुरक्षिततेची साधने नाहीत, असा अहवाल महापालिकेच्या चौकशी समितीने दिला आहे. या वाहनांची इंजिन क्षमता कमी, फायर फायटिंग यंत्रणा स्टेनलेस स्टीलऐवजी प्लॅस्टिकची आहे. तसेच, वाहनांची रुफ लाइट बॅटरीवर नव्हे तर जनरेटरवर असल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. ही योजना ठेकेदाराऐवजी महापालिकेनेच राबवावी; ज्यामुळे पुणेकरांचे पैसे वाचणार असल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘देवदूत’च्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी केली असून, वाहनांमधील काही यंत्रणा बंद तर काही ठिकाणी उपलब्धच नाही. यंत्रणा सक्षम ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र ती नसणे हे योग्य नाही. ही यंत्रणा नसल्याने आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते, असे चौकशी समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुठे यांनी या अहवालात म्हटले आहे. या योजनेसाठी महापालिका जेवढे पैसे मोजत आहेत, तेवढ्या सुविधा ‘देवदूत’च्या वाहनांमध्ये नाहीत, याकडे समितीच्या अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. या वाहनांची देखभाल महापालिकेच्या अग्निशामक व वाहन विभागाकडे सोपवावी असेही अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

Image may contain: text that says "वाहन क्रमांक 'देवदूत 'च्या सहा वाहनांचा लेखाजोखा केंद्राची ठिकाणे वाहनांमधून झालेली कामे (जुलै २०१७ते २०१९) ७५० (कॉल्स) एमएच १२, एनएक्स ३६८० नायडू दवाखाना एमएच १२, एनएक्स ३६८३ कात्रज ८७१ ९९२ एमएच १२, एनएक्स ३६८४ एरंडवणा एमएच १२, एनएक्स ३६८२ कोंढवा एमएच १२, क्यूजी ३६६९ कोंढवा एमएच १२, क्यूजी ३९५ ३६८३ ३९५ (मे २०१८-जून २०१९) भवानी पेठ (मुख्य केंद्र) ३९८ (मे २०१८-जून २०१९)"

पुण्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता : महापौर मोहोळ

 

आपत्ती व्यवस्थापनासाठी २०१७ पासून ‘देवदूत’ची योजना राबविण्यात येते. त्यासाठी पाच वर्षांत सुमारे ५३ कोटी रुपये खर्च होणार असून त्यातील ३७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एवढे पैसे देऊनही आपत्तीत ‘देवदूत’ची वाहने येत नसल्यापासून त्यावरील भरमसाट खर्चाकडे लक्ष वेधणारी विशेष वृत्तमालिका ‘सकाळ’ने गेल्यावर्षी जुलै महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्यामुळे ८१ कोटी रुपयांच्या नवी वाहने खरेदीचा प्रस्ताव रद्द केला होता. मूळ योजना, तिची अंमलबजावणी आणि वाहनांच्या रचनेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यानुसार महापालिकेच्या विविध अग्निशामक केंद्रांतील ‘देवदूत’च्या सहा वाहनांची तपासणी केली आणि त्यातील सेवा-सुविधांची माहिती अहवालात नोंदविली आहे. सर्व वाहनांमध्ये एकूण ४० त्रुटी (त्यात एकाच प्रकारच्याही त्रुटी) असल्याचे दिसून आले आहे. तिचा अहवाल महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिला आहे. चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल ‘सकाळ’ कडेही उपलब्ध आहे. 

'कोरोना' ही स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी; सीओईपीच्या दीक्षांत समारंभात कुलगुरुंनी दिला कानमंत्र

 

तर बचत झाली असती...
एका वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाकाठी ६८ लाख १३ हजार ५९७ इतका खर्च येईल, असे महापालिकेच्या वाहन खात्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले होते. मात्र, त्यावर आपत्ती व्यवस्थापनाने कोणताही आक्षेप घेतला नाही. तसेच, ही दुरुस्ती महापालिकेकडून व्हावी, यासाठीही प्रयत्न झाले नाहीत. ही दुरुस्ती महापालिकेच्या वाहन खाते किंवा अग्निशामक दलाकडून झाली असती तर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाच्या रकमेत बचत झाली असती, असे चौकशी समितीच्या अहवालातून दिसून आले आहे. मात्र, देखभाल-दुरुस्तीचा प्रत्यक्ष खर्च आणि ‘देवदूत’साठी ठरविलेला खर्च, यांच्यातील आकडेवारी स्पष्टपणे दिसत नाही, हेही राजेंद्र मुठे यांच्या निदर्शनास आले आहे.

अत्याचार थांबून दोषींना शिक्षा होण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

‘देवदूत’ योजनेच्या अहवालातील निरीक्षणांवर संबंधित खात्याशी चर्चा करून भूमिका घेतली जाईल. पुणेकरांचे पैसे वाया जाणार नाहीत, यादृष्टीने कार्यवाही होईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका

‘देवदूत’च्या अंमलबजावणीसाठी ठेकेदाराला दिलेले पैसे पाहता, त्या वाहनांची देखभाल-दुरुस्ती महापालिकेच्या वाहन खात्याकडे दिल्यास मोठी आर्थिक बचत होईल. मुंबईत ही वाहने महापालिकेच्याच ताब्यात आहेत. 
- राजेंद्र मुठे, अध्यक्ष, चौकशी समिती, देवदूत 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: care of Devdoot should be taken by the Municipal Corporation Inquiry COmmittee