"एज्युस्पायर' प्रदर्शनामध्ये करिअर, तंत्रज्ञानाची माहिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी... बदललेले अभ्यासक्रम... परीक्षा पद्धती... करिअरच्या संधी आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी-पालकांना "एज्युस्पायर' या शैक्षणिक प्रदर्शनात सोमवारी मिळाली. "यिन'तर्फे या युवा व्यासपीठाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. 30) बालगंधर्व रंगमंदिर परिसरात पाहता येणार आहे. 

शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत; तर डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. "पुणे स्मार्ट सिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, "यिन'चे मुख्य व्यवस्थापक (कम्युनिटी नेटवर्क) तेजस गुजराथी या वेळी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, सुहाना मसाला, मॅक ऍनिमेशन, हॅशटॅग यासोबतच "यिन'च्या काही प्रतिनिधींचे कौशल्यात्मक साहित्य प्रदर्शनात पाहायला मिळेल. 

या प्रदर्शनात इंजिनिअरिंगपासून डिझायनिंगपर्यंत... स्पर्धा परीक्षेपासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत... विविध क्षेत्रांतील शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रियांची माहिती घेता येणार आहे; तर येथे पुणे स्मार्ट सिटीसंदर्भात माहिती देणारा एक विशेष स्टॉलही आहे. 

विनामूल्य प्रवेश 
"एज्युस्पायर' या प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पिरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येत आहे. रोबो, नॅनो ड्रोन आदी तंत्राचा अनुभव त्यासोबत व्हर्च्युअल रिऍलिटीचाही अनुभव घेता येणार आहे. यासाठी इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍स, डिजिटल आर्ट व्हीआरई यांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये रोबोटिक्‍सची प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

Web Title: Career and technology information in eduspire exhibition