विज्ञान संशोधनातील करिअरच्या संधी

sunday-science-school
sunday-science-school

पुणे - आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सेवाधिष्ठित क्षेत्राकडे वाटचाल करीत आहे. पण, कोणत्याही क्षेत्रात तग धरून राहण्यासाठी ज्ञानवर्धित अर्थव्यवस्था असणे गरजेचे आहे. संशोधन हा मूळ पाया आहे. सध्याच्या काळात मूलभूत विज्ञान व संशोधन क्षेत्रात विपुल संधी आहेत. अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांपलीकडे फार मोठे विश्‍व आहे, याची बहुसंख्य विद्यार्थ्यांना माहितीच नसते. याच उद्देशाने ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने संशोधनातील करिअरच्या संधींबाबत व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मार्कांच्या मागे न धावता संकल्पना कशा समजून घ्याव्यात, संशोधक वृत्ती कशी वाढवावी, विज्ञान संशोधन क्षेत्रात कुठल्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी रविवारी (ता. २३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे (आयसर) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान विनामूल्य असून, काही जागा राखीव आहेत. व्याख्यानानंतर ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’तर्फे घेतल्या गेलेल्या ‘सायन्स विझार्ड’ या स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना येथे आहेत संधी...
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूरसायनशास्त्र, सागरी विज्ञान या विषयांमध्ये संशोधनाच्या उत्तम संधी आहेत. संशोधन म्हणजे केवळ शास्त्रज्ञ होणे असे नसून ॲनालिस्ट, पेटंट ॲटर्नी, टेक्‍निकल रायटर, संख्या विश्‍लेषक यासह अनेक पर्याय असतात.

व्याख्यानाविषयी...
कधी - रविवार (ता. २३)
केव्हा - सकाळी ९.३० ते ११.३० 
कुठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
नावनोंदणीसाठी : ९६०७२०८५५२ या क्रमांकावर नाव व इयत्ता व्हॉट्‌सॲप करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com