गोमांस वाहतुक करणाऱ्या वाहनाची ऊसवाहू बैलगाड्यांना धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

यवत  : पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावच्या हद्दीत शेरू ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एका बैलाचा मृत्यू झाला असून पाच बैल व पाच लोक जखमी झाले आहेत. अशी माहीती यवत पोलिसांनी दिली. नवल पंडीत जाधव (रा. अनुराज शुगर कारखाना मुळ राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. 

यवत  : पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावच्या हद्दीत शेरू ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एका बैलाचा मृत्यू झाला असून पाच बैल व पाच लोक जखमी झाले आहेत. अशी माहीती यवत पोलिसांनी दिली. नवल पंडीत जाधव (रा. अनुराज शुगर कारखाना मुळ राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. 

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अनुराज साखर कारखान्याहून आठ गाड्यांचा तांडा खामगाव (ता. दौंड़) परिसरात उस तोडणीसाठी निघाला होता. पाच वाजण्याच्या सुमारास हा तांड़ा पुणे सोलापूर महामार्गावर शेरू ढाब्याजवळ आला. त्यावेळी सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असलेल्या पिकअप (क्र.एमएच 12 एमव्ही 3214) ने सर्वात मागच्या गाडीला वेगात धडक दिली. त्यामुळे ही गाडी तीच्या पुढच्या गाडीवर तर पुढची गाडी तीच्या पुढच्या गाडीवर आदळल्याने अपघात झाला. यात तीन बैल टायर गाड्यांचे सहा बैल जखमी झाले. त्यातील एका बैलाचा काही वेळाने मृत्यू झाला, एक बैल गंभीर जखमी झाला, एका बैलाचे शिंग मोडले तर दोन बैल किरकोळ जखमी झाले.

या अपघातात बैलगाड्यांमध्ये असलेले संतोष पेला चव्हाण, पुंडलीक संतोष चव्हाण, भास्कर मनिराम राठोड, रूकमाबाई भास्कर रोठोड (सर्व रा. अनुराज साखर कारखाना, यवत ता. दौंड, मुळ राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे जखमी झाले. संतोष पेला चव्हाण हे गंभिर जखमी असल्याचे पोलीसांनी सांगीतले. या बैल टायर गाड्यांना ठोकर मारणाऱ्या पिकअप वाहनातून सुमारे 550 किलो वजनाच्या गोमांसाची वाहतुक केली जात होती. अपघातात हे वाहन पलटी झाल्याने गोमांसांचा सडा महामार्गावर पडला होता. यवत पोलिसांसोबत बोरीऐंदी (ता. दौंड) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज गाडे यांनी घटनास्थळी येऊन जखमी बैलांची तपासणी केली. वाहन सोडून पळालेल्या चालका विरूद्ध अपघात करणे, नागरीकांच्या किरकोळ व गंभिर दुखापतीस कारणीभूत होणे असे गुन्हे करण्या बरोबरच अवैध गोमांस वाहतुक करत असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र प्राणी संवंर्धन अधिनियम (5क व 9अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The carriage of beef Vehicles hit the bullock cart