मानसिक धक्‍का सहन न झाल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

संदीप घिसे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) - प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जमविला. याचा मानसिक धक्‍का सहन न झाल्याने प्रेयसीने आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. 

ईश्‍वरी बाबूराव पोकळे (वय 22 रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या प्रियसीचे नाव आहे. याबाबत योगेश गोकूळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) असे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबत पुष्पा बाबूराव पोकळे (वय 50, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 ते 14 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्‍वरी यांना लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर ते दोघेजण एकाच रुमवर राहत होते. मात्र योगेश याने दुसऱ्याच मुलीसोबत विवाह ठरविला. याबाबत त्याने ईश्‍वराला सांगितले. हा धक्‍का सहन न झाल्याने ईश्‍वरी हिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सहायक निरीक्षक अलका सरग याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: the case against lover for the girls suicide