'हिंदकेसरी' योगेश दोडकेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

पुणे : खराडी येथे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या 'महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती' स्पर्धेच्या निधींपैकी 50 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले आणि विश्‍वस्त 'हिंदकेसरी' योगेश दोडके यांच्यासह पाचजणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तालीम संघाचे गोरखनाथ सोमनाथ भिकुले (रा. भवानी पेठ) यांन फिर्याद दिली आहे. दामोदर लक्ष्मणराव टकले (रा. उंड्री), योगेश लक्ष्मण दोडके, अमोल प्रल्हाद भुतेकर, ललित दत्तात्रेय भुतेकर आणि बबिता ललित भुसारे (सर्व रा. अतुलनगर, वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने 2016 मध्ये खराडी येथे राष्ट्रीय तालीम संघाच्या सहकार्याने पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सुमारे एक कोटी 83 लाख एवढा खर्च आला होता. त्यापैकी आंतरराष्ट्रीय खेळाडूंची बक्षिसे, रॉयल्टी, पंच आणि इतर मानधन यासाठी महापालिकेने स्वत: धनादेशाद्वारे खर्च केला. इतर कामांसाठी पालिकेने एक कोटी 26 लाख 50 हजार रुपयांचा निधी राष्ट्रीय तालीम संघाच्या बॅंक खात्यात जमा केला होता. परंतु तालीम संघाचे टकले आणि दोडके यांनी अन्य पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता आणि निविदा प्रक्रिया न राबविता ठेकेदारांना नियमबाह्य कामे दिली.

चुकीची आणि बनावट बिले महापालिकेकडे सादर करून 50 लाख रुपयांचा अपहार केला. तसेच, दोडके यांच्याकडे कामास असलेल्या भुतेकर आणि भुसारे यांच्या नावे चुकीच्या पद्धतीने धनादेश काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के (गुन्हे) करीत आहेत.
 
Web Title: case file against five people including 'Hindakesari' Yogesh Dodake