Video : पिंपरीत कुत्र्याला अमानुष मारहाण; गुन्हा दाखल

टीम ईसकाळ
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

-पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्याला केली अमानुष मारहाण,
- मारहाणीचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्याला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

बसलिंग रामचंद्र घायगुळे (वय :५०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बिगारी काम करतात. मंगळवारी दुपारी 'हा' कुत्रा बसलिंगच्या आईला चावला. यातून त्याने हे कृत केल्याचे सांगण्यात येत आहे. 

कुत्र्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, प्राणीमित्रांनी त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी कृष्णा गंगाराम जमादार (वय २०) यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case File against one for assaulting dog brutally in Pimpri