सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट  करणाऱ्या तरुणाविरोधात खडकवासला मतदार संघातील महिला कार्यकर्त्यांनी सिंहगड रस्ता परिसरातील पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज मंगळवारी रात्री 10.30 वाजता दिला.

पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली.

याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी रात्री उशिरा १०.३० वाजता सिंहगड रस्ता परिसरातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात सायबर क्राईम मार्फत याचा तपास केला जाणार आहे. असे पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
    
''समाजाला लागलेली हि किड नाहीशी व्हावी यासाठी इथुन मागे देखील अनेक वेळा कायदेशीररीत्या आम्ही मार्ग अवलंबत आहोत. पण आता हे शांत बसणं अशक्य होतंय. कमजोर कधीच नव्हतो पण संस्कार बरोबर घेऊन वाटचाल करतोय म्हणून विचारांनी लढत होतो. पण यापुढे पवार साहेब, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे व पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील व बेताल वक्तव्य कराल तर, कायदेशीर गुन्हा दाखल करू याची दखल घ्यावी. असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

Web Title: case file against youth who did objectionable comment about Supriya Sule on social media